Thu, Jun 04, 2020 02:09होमपेज › Pune › आयटी पार्कमध्ये जोरदार पावसामुळे वाहतूक कोंडी

आयटी पार्कमध्ये जोरदार पावसामुळे वाहतूक कोंडी

Last Updated: Oct 10 2019 1:19AM
हिंजवडी : वार्ताहर

मागील काही दिवसांपासून हिंजवडी परिसराला परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. या परिसरात दररोज सायंकाळी जोरदार पाऊस पडत आहे.  बुधवारी (दि. 9) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास जोरदार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी ढाले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. पावसामुळे या भागातील वाहतूक संथ गतीने सुरू होती. 

बुधवारी सायंकाळी आयटी कंपनी सुटण्याच्या वेळेस जोरदार पाऊस सुरू झाला.  विविध कंपनीतील कामगारांच्या गाड्या एकाचवेळी रस्त्यावर आल्याने  हिंजवडीचा मुख्य रस्ता व लक्ष्मी चौक मार्गे भूमकर वस्तीकडे जाणार्‍या रस्त्यावर गर्दी झाली.  सकाळी आणि सायंकाळीसुध्दा दोन-तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली.  

माण येथील फेज 3 जवळील मेगा पोलीस सोसायटी शेजारील रस्त्यावरही पाणी साचले. त्यातून वाट काठणे वाहनचालकांना कठीण जात होते. चांदे-नांदे रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी चांगलीच दमछाक झाली होती.