होमपेज › Pune › पुणे : एकाच दिवशी ४ बलात्काराचे गुन्हे

पुणे : एकाच दिवशी ४ बलात्काराचे गुन्हे

Published On: Feb 10 2018 11:49AM | Last Updated: Feb 10 2018 11:49AMपिंपरी : प्रतिनिधी

लग्नाचे अमिष दाखवून एका ४२ वर्षीय महिलेवर तसेच दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार केले तर एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत लैगिंक अत्याचार, बलात्काराच्या चार घटना एकाच दिवशी दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. 

सांगवी पोलिस ठाण्यात गणेश मारुती मस्के, हरी गोविंद राठोड, संतोष महाले आणि अजय या चौघांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. यामधील पिडीत महिलेचे ४२ वर्षे वय आहे, तर इतर मुलींचे १४, १६, १७ अशी वय आहेत. महिला अत्याचाराच्या घटना आणि एकाच दिवशी सांगवी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये परिसरात खळबळ उडाली आहे. यातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.