Tue, May 26, 2020 19:20होमपेज › Pune › पुणे : प्रभात टॉकीजसमोरील इमारतीला आग 

पुणे : प्रभात टॉकीजसमोरील इमारतीला आग 

Published On: May 16 2019 12:26PM | Last Updated: May 16 2019 12:26PM
पुणे : पुढारी ऑनलाईन

पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या  शनिवार पेठेतील प्रभात टॉकीजसमोरील  एका इमारतीवा आज (ता.१६)  सकाळी भीषण आग लागली. दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्नीशमन दलाने तत्परता दाखविल्याने या आगीतून २५ जणांची सुटका झाली. आग नियंत्रणात आल्याने कुलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. 

पुण्यातील प्रभात सिनेमा गल्लीतील जोशी संकूल इमारतीला आग लागली. काही वेळामध्येच धूराचे लोट इमारतीमध्ये पसरल्याने रहिवाशी घाबरले.  तत्काळ अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अर्ध्या तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले