पुणे : प्रतिनिधी
पुणे येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदे प्रकरणी, कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय आणि घरावर पोलिसांच्या धाडी टाकण्यात आल्या. पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे दलित समाजातील लोकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. त्यानंतर राज्यभर ३ जानेवारी रोजी बंद पाळण्यात आला होता.
या घटनेनंतर ७ जानेवारी २१०८ रोजी कबीर कला मंचच्या चार जण आणि रिपब्लिकन पँथरच्या चार जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता .या प्रकरणात आज पहाटेपासून पुण्यातील कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर व मुंबईत रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर पुणे पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. तपास काम सुरू आहे .
दरम्यान या धाडीच्या बहाण्याने कबीर कला मंच आणि दलित चळवळीला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.