Sat, Aug 17, 2019 19:56होमपेज › Pune › कोल्हेंना पाडणार; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

कोल्हेंना पाडणार; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

Published On: Mar 16 2019 8:06PM | Last Updated: Mar 16 2019 7:31PM
पिंपरी : प्रतिनिधी

शिवसेनेतून राष्ट्रवादीतून आलेले आणि नुकतेच शिरूर लोकसभेचे तिकीट जाहीर झालेल्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिरूरमधून राष्ट्रवादीची उमेदवारी देताना डावललेल्या माजी आमदार विलास लांडे यांचे कार्यकर्त्यांनी 'अमोल कोल्हे यांना पाडणार' असल्याचे बॅनर पिंपरी शहरात लावले आहेत. या बॅनरची पिंपरी शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. 

शिरूरमधून माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादीतर्फे तीव्र इच्छुक होते. त्यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात रान पेटवले होते मात्र शिवसेनेतून आयात केलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने लांडे समर्थक अस्वस्थ आहेत. यामुळे लांडेंच्या समर्थकांकडून कोल्हे यांच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे. 'अमोल कोल्हे राष्ट्रवादीतून लढणार ,आम्ही त्याला आमची ताकद दाखवणार , लांडे साहेबांनी अडचणीच्या काळात राष्ट्रवादीला साथ दिली पण आता तुम्हाला जागा दाखवणार, कोल्हेला पाडणार अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे नाराज विलास लांडे यांना राष्ट्रवादीतील श्रेष्ठी कसे शांत करणार हा प्रश्न आहे?