Fri, Sep 20, 2019 21:48होमपेज › Pune › सह्याद्री पर्वतरांगांतील उंच शिखरावर वसलेले श्री क्षेत्र भीमाशंकर(Video)

सह्याद्री पर्वतरांगांतील उंच शिखरावर वसलेले श्री क्षेत्र भीमाशंकर(Video)

Published On: Aug 20 2018 6:46PM | Last Updated: Aug 20 2018 6:46PMभीमाशंकर : अशोक शेंगाळे

श्री क्षेत्र भीमाशंकर हे सह्याद्री पर्वतरांगांतील उंच शिखरावर वसलेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग चोहोबाजूंनी पसरलेले घनदाट अभयारण्य येथे आहे. भीमाशंकरचे दर्शन घेऊन झाल्यानंतर व वरती पायर्‍या चढून कमलजामातेचे दर्शन घेतल्यानंतर पूर्ण दर्शन अथवा यात्रा पूर्ण होते, अशी येथील आख्यायिका आहे. शेकरूसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. भीमा नदीचा उगमही येथूनच झाला आहे. देशातून बारमाही लाखोंच्या संख्येने भक्तभाविक, पर्यटक येथे येतात.

Image may contain: mountain, outdoor, nature and water

महाशिवरात्र व श्रावण महिन्यात दर्शनासाठी आणि पावसाळी पर्यटनासाठी गर्दीचा महापूर येथे येतो. भीमाशंकरचे मंदिर कोरीव काळ्या दगडांमध्ये १२ व्या शतकाच्या मध्यकाळात बांधले आहे. या मंदिराची रचना हेमाडपंती शैलीची असून, सुंदर कोरीव मूर्ती येथे पाहावायास मिळतात. हे ठिकाण तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटनासाठी लोकांना आकर्षित करते. निसर्गाचाी मुक्त उधळण या परिसरात पाहावयास मिळते. जंगलात प्राणी, पशू-पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे आढळतात. याच जंगलात अनेक औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत.

Image may contain: sky, mountain, outdoor, nature and water

पावसाळ्यात निसर्गरम्य परिसर, दाट धुके, बोचरी थंडी, रिमझिम पावसाच्या सरी यांनी हा परिसर व्यापलेला आहे. याच ठिकाणांबरोबर कोकण कडा, वनस्पती पॉइंट, नागफणी, भाकादेवी, भटीचेरान, कोथरणे, मंदोशी, पोखरी, डिंभे जलाशय, गोहे जलाशय, कोंढवळ परिसरातील रम्य धबधबे ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. भीमाशंकर मंदिर व जंगल परिसर अनेक ऐतिहासिक वास्तू व अभयारण्याचे ठिकाण आहे. मंदिराबाहेर पोतुर्गीज काळातील घंटा, घंटेलगत शनिमंदिर, गोरक्ष मंदिर, सुरुवातीला असलेले कमलजादेवी मंदिर ही प्राचिन मंदिरे आहेत; तसेच भीमाशंकर अभयारण्यात हनुमंत तळे या ठिकाणी हनुमान व अंजनीमातेचे मंदिर आहे.

Image may contain: mountain, outdoor, nature and water

जंगलातच गुप्त भीमाशंकर हे ठिकाण असून, येथे साक्षी विनायकाचे मंदिर आहे. भोरगड हे ठिकाण भीमाशंकरलगत जंगलात असून, येथे जुन्या काळातील लेणी आहेत. भोरगडाच्या पायथ्याला कोटेश्‍वराचे मंदिर आहे. प्राचीन काळातील हे मंदिर आहे. या ठिकाणी अनेक देवतांच्या मूर्ती येथे आहेत. कुठेही किल्ले वा लेण्या आढळत नाहीत. मात्र भोरगड हा एकमेव किल्ला व याच किल्ल्याला लेण्या आहेत. पुणे जिल्ह्यात श्री क्षेत्र भीमाशंकर हे खेड व आंबेगाव तालुक्यांच्या सरहद्दीवर आहे. या परिसरातील अभयारण्य पुणे, रायगड, ठाणे जिल्ह्यांच्या हद्दीवर १३०.७८  चौरस किमी पसरलेले आहे. हे जंगल सदाहरित गर्द हिरव्या झाडीने व्यापले आहे.

Image may contain: 3 people, people standing, sky and outdoor

भीमाशंकर ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार तीनशे फूट उंचावर असल्यामुळे हा परिसर अतिवृष्टी पावसाळी प्रदेश, थंड हवेचे ठिकाण व कड्यावरून नजरेच्या टप्प्यात सभोवतालचा परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. या परिसरात राहण्यासाठी खासगी हॉटेल, वन्य जीव विभागाने ग्रामपरिस्थिती विकास समिती स्थापन करून राहण्याची व जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे; यामुळे स्थानिकांना म्हतारबाची वाडी टोल नाका, कोंढवळ धबधबा, आहुपे निसर्गसौदर्य, भोरगिरी परिसरतील धबधबे या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

Image may contain: 5 people, people standing and people walking

Image may contain: 9 people, people smiling, crowd

Image may contain: 1 person, food

कसे याला?

मुंबई ते भीमाशंकर हे अंतर २४० कि. मी. आहे; तर पुणे ते भीमाशंकर हे अंतर १२५ कि. मी. आहे. भीमाशंकरकडे येण्यासाठी मंचर, घोडेगाव, डिंभे, तळेघरमार्गे एक रस्ता आहे. राजगुरुनगर, वाडा, तळेघरमार्गे एक रस्ता आहे. काही धाडसी पर्यटक हे शिडी घाट, बैलघाट, पदरघाटानेही पायी चढून येतात. भीमाशंकरमध्ये येण्यासाठी एकमेव मंचरमार्गे रस्ता असून, पुणे (शिवाजीनगर) आगारातून दर दोन तासांनी एसटी बस उपलब्ध आहेत.