Mon, Sep 24, 2018 03:01



होमपेज › Pune › पुरंदरेंच्या शिवसृष्टीला आमचा विरोध : विखे पाटील

पुरंदरेंच्या शिवसृष्टीला आमचा विरोध : विखे पाटील

Published On: Feb 13 2018 6:27PM | Last Updated: Feb 13 2018 6:27PM



पुणे : प्रतिनिधी 

बाबासाहेब पुरंदरे यांच्याद्वारे उभा करण्यात येणार्‍या शिवसृष्टीला सरकारने निधी देऊन मेहरबानी करु नये.  पुरंदरे यांच्याविषयी लोकांच्या मनात असंतोष आहे. त्‍यामुळे याला काँग्रेसचाही विरोध असल्‍याचे राज्‍याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या उभारण्यात येणार्‍या शिवसृष्टीसाठी इतिहास संशोधकांची समिती स्थापन करून त्यांच्या मदतीने शिवसृष्टी उभा करावी. पुरंदरे यांच्याद्वारे उभारणाऱ्यात येणाऱ्या  शिवसृष्टीला काँग्रेसचा विरोध राहणार असल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.