Sat, Jan 18, 2020 06:23होमपेज › Pune › पुणे : बुधवार पेठेत महिलेचा चाकूने भोसकून खून

पुणे : बुधवार पेठेत महिलेचा चाकूने भोसकून खून

Published On: Aug 14 2019 12:06PM | Last Updated: Aug 14 2019 12:06PM

खुन झालेली महिलापुणे : प्रतिनिधी

बुधवार पेठेत महिलेचा चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना आज (ता.१४) पहाटे पाचच्या सुमारास घडली. आरोपी हिरामुल मलिक शेख (वय 35) याने महिलेचा खून करून पळ काढला. मीना गब्बर काझी शेख (वय ३०, रा.बुधवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर नावंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. आरोपीचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी हिरामुल शेख आणि खून झालेली महिला मीना शेख हे दोघे पती-पत्नी सारखे बुधवार पेठेत एकत्र राहत होते. तसेच मीना शेख ही देहविक्रीचा व्यवसाय करत होती. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणातून वाद सुरू होते. त्यातून हिरामुलने आज पहाटेच्या सुमारास मीना शेखवर सपासप चाकूने वार केले त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.