Tue, Sep 17, 2019 20:08होमपेज › Pune › मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शनिवारी पुण्यात

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शनिवारी पुण्यात

Published On: Sep 11 2019 6:00PM | Last Updated: Sep 11 2019 5:50PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुणे : प्रतिनिधी

राज्यात गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने केलेली विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा सुरू आहे. राज्यभर सुरू असलेली ही यात्रा शनिवारी (ता.१४) संध्याकाळी पाच वाजता पुणे शहरात येणार असल्याची माहिती अध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली.

महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा शुक्रवारपासून (ता. १३) सुरू होणार आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता हडपसर येथे पुणे शहर भाजपच्यावतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. महाजनादेश यात्रेच्या मगरपट्टा, पूलगेट, गोळीबार चौक, सेव्हन लव्हज चौक, स्वारगेट, सारसबाग, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, दत्तवाडी, नळ स्टॉप, कर्वे रस्ता, ङ्गर्ग्युसन रस्ता, शेतकी महाविद्यालय चौक, संचेती चौक, आरटीओ, जहांगीर रुग्णालय, तारकेश्‍वर चौक, येरवडा, नगर रस्ता मार्गे चंदननगर असा यात्रेचा मार्ग आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी दहा वाजता दांडेकर पूल येथून यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.