होमपेज › Pune › युती बाबत शिवसेनेने निर्णय घ्यावा : मुनगंटीवार

युती बाबत शिवसेनेने निर्णय घ्यावा : मुनगंटीवार

Published On: May 17 2018 8:43PM | Last Updated: May 17 2018 8:43PMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन भाजपा आणि शिवसेनेचे एक विचार आहे. युती तोडणार्‍यामध्ये आमच्या पक्षाचे नाव नसून युती जोडणार्‍यामध्ये आमच्या पक्षाचे नाव आहे. यामुळे युतीबाबतचा निर्णय शिवसेनेने घ्यावा, युतीचा निर्णय घेण्याची जबाबदारी आता आमची नसल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. वृक्ष लागवडीच्या पुणे विभागाच्या आढावा बैठकीसंदर्भात ते पुण्यामध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

यावेळी वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, साथ मे आयेंगे तो साथ मे लढेंगे, नही आयेंगे तो अकेले महाराष्ट्र में फिरसे जित के आयेंगे. महाराष्ट्राला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मगरमिठीतून काढण्यासाठी दुर्देवाने पंधरा वर्ष लागले. त्यामुळे पुन्हा एकदा अशा पक्षाच्या हाती राज्य जावू नये अशी आमची अपेक्षा आहे. या अपेक्षापोटीच आम्ही नेहमी शिवसेना युतीची भूमिका मांडत आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.