Fri, Sep 20, 2019 21:28होमपेज › Pune › शेट्टी - जानकर यांच्यात लोकसभा निवडणुकीची खलबते

शेट्टी - जानकर यांच्यात लोकसभा निवडणुकीची खलबते

Published On: Mar 12 2019 3:26PM | Last Updated: Mar 12 2019 3:26PM
पुणे : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यामध्ये मंगळवारी लोकसभा निवडणुकीची खलबते झाली.  

बाणेर येथील एका हॉटेलमध्ये स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकांच्या रणनीतीवर शेट्टी व जानकर यांच्यात स्वतंत्रपणे दीर्घकाळ चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. याबाबतची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका जाहीर केली जाणार आहे.            

बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, माजी अध्यक्ष दशरथ सावंत, सतीश काकडे, माणिक कदम, योगेश पांडे, सुबोध मोहिते, सावकार मदनाईक, भगवान काटे, महावीर अकोले, अनिल पवार, जालिदर पाटील व अन्य सदस्य उपस्थित होते.