Wed, Jul 24, 2019 14:19होमपेज › Pune › माऊलींचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

माऊलींचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

Published On: Jun 25 2019 8:14PM | Last Updated: Jun 25 2019 8:14PM
पुणे / आळंदी : प्रतिनिधी

आज प्रस्थान ठेविले ज्ञानियाच्या द्वारी।
उद्या सकलजण जाणार विठुच्या नगरी।।

सर्वोच्च भक्‍तीची अनुभूती नक्की काय असते अन्‌ सोहळ्याचा दिमाखही काय असतो, “याची याचि देही याचि डोळा’ प्रचिती अलंकापुरीत मिळाली.. ऊन, वारा, पाऊस, कशाचीही तमा न बाळगता पंढरीच्या वाटेवरती निघालेल्या लाखो वैष्णवांचा भक्तिकल्लोळ वातावरणात माउलींच्या पालखीचे सायंकाळी ७ वाजून १५ मिनीटांनी प्रस्थान झाले.

गुलाब पाकळ्यांची उधळण व रांगोळ्यांच्या पायघड्या, अशा दिमाखदार व भक्तिपूर्ण वातावरणात आज (मंगळवारी) संध्याकाळी चारच्या सुमारास संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. दरम्यान, प्रस्थानवेळी पावसाचे वातावरण झाले मात्र, जलधारामध्ये भिजण्याचा आनंद भक्तिरसात चिंब झालेल्या वारकऱ्यांना मिळाला नाही. आज माऊलींचा पालखी सोहळा आळंदीमध्येच आजोळी थांबरणार आहे, उद्या पालखी सोहळा पुण्यात येईल.