Wed, Jun 19, 2019 08:40होमपेज › Pune › पुणेकरांचा डेटा हॅक

पुणेकरांचा डेटा हॅक

Published On: Oct 12 2018 1:36AM | Last Updated: Oct 12 2018 1:27AMपुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

सरकारी योजनेचा आधार घेऊन सोशल मीडियातून पोस्ट व्हायरल करून पुणेकरांची वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ‘आयुष्यमान भारत’ या योजनेचे सरकारचा काहीही संबंध नसलेले बोगस अ‍ॅप व्हायरल करून त्यामधून मतदारांची माहिती संकलित करण्याचा ‘उद्योग’ सुरू आहे. लाभार्थ्यांची यादी अगोदरच निश्‍चित झाली असताना योजनेचा लाभ घेण्यासाठीचे आवाहन करणार्‍या या फेक पोस्टला पुणेकर बळी पडत असून, या प्रकाराची ‘पुढारी’ने पोलखोल केली आहे.

असा आहे ‘गोलमाल’! 

    लिंक:हीींिं://ुुु.र्रूीीहाररप-लहरीरीं.ळप
    पंतप्रधान मोदी यांचा फोटो व आयुष्यमानचा
लोगो असलेली वेबसाईट उघडते. 
    वापरकर्त्याला योजनेची वेबसाईट असल्याचा
भास होण्यासाठी लोगोचा वापर.
    नाव, वय, राज्य आणि मोबाईल नंबर
भरायला सांगितले जाते.
    आरोग्य विम्याविषयक दोन प्रश्‍न विचारले जातात.
    माहिती सबमिट केल्यानंतर ही पोस्ट दहा मित्रांना किंवा ग्रुपवर पाठवा, असा संदेश येतो.
    संदेश दहा जणांना पाठवला तरी नोंदणी क्रमांक येत नाही आणि फसगत लक्षात येते.


डेटा चोरीसाठीच...?

 दैनिक ‘पुढारी’ने माहिती घेतली असता ही वेबसाईट बोगस असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली. त्याचा मूळ योजनेशी काहीही संबंध नाही. ॠेऊरववू  या इंटरनेट डोमेन रजिस्ट्रार व वेब होस्टिंग कंपनीकडून महाराष्ट्रातील काही अज्ञात व्यक्तीने ओळख गुप्त ठेवून ही वेबसाईट नोंद केली आहे.  ॠेऊरववू चे जगभरात 17 दशलक्ष ग्राहक आणि 6 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत.  ही  कंपनी इंटरनेट डोमेन वेब होस्टिंग सेवा पुरवते; मात्र वेबची माहिती इतर बाबींचा त्यांचा संबंध नसतो. पण केवळ माहिती संकलन करण्यासाठी अशा स्वरूपाच्या वेबसाईट नोंदणी करून डेटा गोळा केला जात असल्याचे या क्षेत्रातील अभ्यासक चंद्रकांत भुजबळ यांनी सांगितले.