Sat, Jul 04, 2020 10:29होमपेज › Pune › बारामतीत पुन्हा कोरोनाचा रुग्ण सापडला

बारामतीत पुन्हा कोरोनाचा रुग्ण सापडला

Last Updated: Jul 01 2020 10:44AM
बारामती : पुढारी वृत्तसेवा 

शहरातील भिगवण रस्त्यावरील जळोची भागातील एका आयटी अभियंत्याला कोरोनाची लागण झाल्‍याचे समोर आले आहे. बारामती तालुक्यातील हा २७ वा रुग्ण आहे. 

हा अभियंता लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम काम करत होता. परंतु वैद्यकीय तपासणीच्या निमित्ताने तो दि. २१ जून रोजी पुण्याला गेला होता. तेथे किंवा प्रवासादरम्यान त्याला बाधा झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. तेथून परतल्यानंतर त्याला लक्षणे जाणवू लागल्याने त्याने स्वतःहून रुई कोविड रुग्णालयात जात तपासणी करुन घेतली. तपासणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. 

दरम्यान तालुक्यातील हा २७ वा रुग्ण आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामती शहर कोरोनामुक्त होते. या रुग्णामुळे कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे.