होमपेज › Pune › पंतप्रधानांकडून लष्कराचा अवमान : पृथ्वीराज चव्हाण 

पंतप्रधानांकडून लष्कराचा अवमान : पृथ्वीराज चव्हाण 

Published On: Mar 04 2019 5:38PM | Last Updated: Mar 04 2019 5:38PM
पुणे : प्रतिनिधी

पुलवामा हल्ला झाल्यापासून घडलेल्या प्रत्येक घटनाक्रमात देशातील विरोधी पक्ष सरकारच्या सोबत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजपचे नेते राजकीय सभा घेत आहेत. या सभांमधून पंतप्रधान मोदी "राफेल विमान असते, तर वेगळे चित्र दिसले असते" असे म्हणतात. त्यांचे हे वक्तव्य हवाई दलाचा पराभव झाल्याचे दर्शवते. त्यामुळे मोदींनी हवाई दल आणि जवानांचा अवमान केला असून याबद्दल त्यांनी जवानांची माफी मागावी, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. मोदींनी या घटनेचे राजकारण करणे थांबवावे, अशी मागणी देखील यावेळी चव्हाण यांनी केली. 

वाचा : राफेलच्या वक्तव्यावर कॉमन सेन्स वापरा : पंतप्रधान मोदी

पुण्यातील कॉग्रेसभवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. याप्रसंगी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, नगरसेविका सुजाता शेट्टी, अजय दरेकर, गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे, संजय बालगुडे आदी उपस्थित होते. 

वाचा : दहशतवादी मारायला गेला होता, की झाडं पाडायला?

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, पुलवामा हल्ल्यातील शहीदांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवले जात असताना मोदींसह त्यांचे नेते  मात्र प्रचारसभा घेत होते. हे चित्र जवानांचा अवमान करणारे असल्याचे ते म्हणाले.