Thu, Nov 15, 2018 11:21होमपेज › Pune › पुणे : कामावरून काढल्याने पीएमपीएलच्या कामगाराची आत्महत्या

पुणे : कामावरून काढल्याने पीएमपीएलच्या कामगाराची आत्महत्या

Published On: Feb 14 2018 9:17AM | Last Updated: Feb 14 2018 9:17AMपिंपरी : प्रतिनिधी

कामावरुन काढून टाकल्याने पीएमपीएलच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथे मंगळवारी रात्री उशिरा घडली. तुकाराम निवृती मुंडकर ( ४२, रा. हनुमान कॉलनी नं.६, चक्रपाणी रोड, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम यांनी रात्री दहाच्या सुमारास  छताच्या पंख्याला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तुकाराम हे पीएमपीएमएल मध्ये चालक म्हणून कामाला होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांना कामावरून काढून टाकले होते.  बेकारीला कंटाळून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.