Wed, Jun 26, 2019 01:09होमपेज › Pune › झाडे खरेदीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी

झाडे खरेदीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी

Published On: Feb 26 2019 1:18AM | Last Updated: Feb 26 2019 1:18AM
पुणे ः प्रतिनिधी

सॅलिसबरी पार्क भागात महापालिकेच्या वतीने टॉपीअरी वृक्षांचे उद्यान उभारण्यात येणार आहे. या उद्यानात 65 झाडे लावली जाणार असून, यासाठी दीड कोटीची निविदा काढण्यात आली आहे. एक झाड तब्बल 14 लाख किमतीचे खरेदी केले जाणार असून, ही पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी आहे. ही उधळपट्टी थांबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी जलपर्णीच्या वादग्रस्त निविदेच्या चौकशी अहवालाचे काय झाले, असा सवालही उपस्थित करण्यात आला. 

शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक महेंद्र पाठारे, भैयासाहेब जाधव, गफूर पठाण, नगरसेविका सुमन पठारे, नंदा लोणकर, स्थायीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. नीलेश निकम, श्रीकांत पाटील, महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर, युवकचे शहराध्यक्ष राकेश कामठे, नितीन कदम, प्रदीप देशमुख, विजय खराडे, संतोष नांगरे, गणेश नलावडे, वासंती काकडे, राजेंद्र खांदवे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

तब्बल 14 लाखांचे एक झाड खरेदी करणे म्हणजे पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी आहे. ही उधळपट्टी थांबवावी, आणि शहरांमधील तलावामध्ये नसलेल्या जलपर्णीसाठी काढण्यात आलेल्या निविदाप्रक्रियेची चौकशी करावी. या निविदा प्रक्रियेचा चौकशी अहवाल त्वरित सादर करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी चेतन तुपे यांनी केली.