होमपेज › Pune › दिलीप माजगावकरांना 'मसाप जीवनगौरव' जाहीर 

दिलीप माजगावकरांना 'मसाप जीवनगौरव' जाहीर 

Published On: May 16 2019 12:46PM | Last Updated: May 16 2019 12:48PM




पुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा 'मसाप जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला. वाङमयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल परिषदेचा डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार नोहा मस्सील (इस्राईल) यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. 

२७ मे रोजी परिषदेच्या ११३ व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे यावेळी उपस्थित होते.