होमपेज › Pune › दोनशे पुस्तके लिहून भागवली लिखाणाची तृष्णा

दोनशे पुस्तके लिहून भागवली लिखाणाची तृष्णा

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 1:02AMदापोडी ः संगीता पाचंगे

प्राध्यापक म्हणून एकतीस वर्षे सेवा करत असताना आपली लिखाणाची आवड जोपासून तब्बल दोनशे पुस्तके लिहिण्याची किमया दापोडीतील श्रीमती सी. के. गोयल कला व वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. किशोर निवृत्ती जगताप यांनी लीलया पार पाडली आहे. 

डॉ. जगताप यांनी शिक्षण क्षेत्रातील तब्बल दोनशे पुस्तके लिहल्याबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. डॉ. जगताप हे जनता शिक्षण संस्थेच्या दापोडी येथील श्रीमती सी. के. गोयल कला व वाणिज्य महाविद्यालयात जुन 1987 पासून वाणिज्य विद्याशाखेत पदवी व पदव्युत्तर विभागात अध्यापनाचे कार्य करत होते. महाविद्यालयात वाणिज्य विभाग प्रमुख तसेच सन 2008 ते 2016 या कालावधीत प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले आहे. डॉ. जगताप यांनी पुणे विद्यापीठातून एमफिल, पीएचडी, एमबीए, एलएलबी आदी  पदव्या प्राप्त केल्या आहेत. पुणे विद्यापीठातही त्यांनी विविध पदे भूषविली आहेत. या सगळ्यांचा अनुभव गाठीशी धरून त्यांनी लेखनाचा छंद जोपासला आहे. 

डॉ. जगताप हे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे संशोधक मार्गदर्शक म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत 13 विद्यार्थ्यांना ‘पीएचडी’ तर 5 विद्यार्थ्यांना ‘एमफील’ पदवी प्रदान करण्यात आली आहे. 

डॉ. जगताप यांनी कायदा, वाणिज्य व व्यवस्थापन या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांसाठी अकौन्टन्सी, डीटींग, स्टिंग, प्रशासन, व्यवस्थापन, कंपनी कायदा, मार्केटिंग, बॅकिंग, उद्योजकता, आयकर, संशोधन, संज्ञापन, अर्थशास्त्र आदी विषयांवरील 200 संदर्भ ग्रंथाचे लेखन केले आहे. वाणिज्य, व्यवस्थापन, कायदा, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाऊंटंट, अकाऊंटंट व पी. एच.डी संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या संदर्भ ग्रथांचा विशेष उपयोग होत असून नुकताच त्यांचा 200 वा संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्यात झाला.