Thu, Jun 04, 2020 12:28होमपेज › Pune › मयंकच्या झुंजार शतकाने भारताची शानदार सुरुवात

मयंकच्या झुंजार शतकाने भारताची शानदार सुरुवात

Last Updated: Oct 10 2019 5:46PM
पुणे : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीला आज पुण्यात प्रारंभ झाला. पहिल्या कसोटीतील द्विशतकवीर मयंक अग्रवालनेही दुसऱ्या कसोटीमध्येही  झुंजार शतकी खेळी करून भारताला भक्कम सुरूवात करून दिली. यजमान भारताने पहिल्या दिवसअखेर ३ बाद २७३ अशी भक्कम मजल मारली. दरम्यान पहिल्या दिवशी अंधुक वातावरणामुळे खेळ अगोदर थांबवण्यात आला. भारताने मयंक अग्रवालच्या शतकाच्या जोरावर दिवसअखेर 3 बाद 273 एवढी धावसंख्या उभारली. दिवसअखेर 85.1 इतक्या षटकांचा खेळ झाला. भारताचा कर्णधार विराट कोहली 63 तर रहाणे 18 धावांवर खेळत आहेत. 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीस आज पुण्यातील महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरुवात झाली. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, १० व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. रबाडाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर न डगमगता मयंक अग्रवालने चेतेश्वर पुजाराच्या साथीने सयंमी खेळ करत उपहारानंतर अर्धशतक झळकावले. त्यानंतर चेतेश्वर पुजारानेही आपले कसोटीतील अर्धशतक पूर्ण करून संघाचा दिडशे धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र, चेतेश्वर पुजाराच्या रुपाने भारताला दुसरा धक्का बसला. अर्धशतक पूर्ण करताच काही वेळात तो बाद झाला. रबाडानेच पुजाराची विकेट मिळविली. डु प्लेसिसने पुजाराचा झेल पकडला. मयंक व पुजाराने १३८ धावांची भागिदारी केली.

संयमी पण तितक्याच आक्रमकतेने फटकेबाजी करून टीम इंडियाचा सलामीवीर मयंक अग्रवालने आफ्रिकेविरुद्धच्या दुस-या कसोटीत सलग दुसरे कसोटी शतक फटकावले. ९९ धावसंख्येवर असताना त्याने फिलँडरला एक शानदार चौकार ठोकून शतक साजरे केले. मात्र, त्यानंतर तो १०८ (१९५ चेंडू, १६ चौकार आणि २ षटकार) धावांवर बाद झाला. रबाडाने डु प्लेसिस करवी मयंकला झेलबाद केले. भारताला हा तिसरा धक्का बसला. मयंक बाद झाल्यावर कोहली आणि रहाणे यांची चांगलीच जोडी जमली. या दोघांनी संयमपणे खेळ करत हा दिवस खेळून काढण्याचे काम चोखपणे बजावले.