Tue, Jan 22, 2019 07:22होमपेज › Pune › जादूटोण्याच्या संशयावरून पती-पत्नीची हत्या

जादूटोण्याच्या संशयावरून पती-पत्नीची हत्या

Published On: Nov 08 2018 5:55PM | Last Updated: Nov 08 2018 5:55PMराजगुरूनगर : वार्ताहर

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील औंढे येथे वयोवृद्ध पती-पत्नीचा निर्घृण खून करण्यात आला आहे. हे दोघे जादूटोणा करतात या कारणावरून त्यांचा खून करण्यात आला. आज, दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. नावसु कुणाजी मुकणे (वय ५५), आणि लिलाबाई नावसु मुकणे (वय ४८) अशी मृत्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, लिलाबाई आणि नावसु मुकणे हे दोघे पती पत्नी कोहिंडे (ता. खेड) येथे राहत होते. हे दोघे जादूटोणा करीत असल्याचा संशय घेऊन संशयिताने हे हत्याकांड केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोहींडे गावातील ७ ते ८  संशयिताना ताब्यात घेतले आहे.  कोहिंडे (ता खेड) येथील ८ जणांनी हे अघोरी कृत्य केल्याचा संशय पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी व्यक्त केला आहे.