Sat, Aug 24, 2019 10:21होमपेज › Pune › पुणे : भवानीपेठेतील फायबर कारखान्यास भीषण आग

पुणे : भवानीपेठेतील फायबर कारखान्यास आग

Published On: Nov 08 2018 8:25PM | Last Updated: Nov 08 2018 8:28PMपुणे : प्रतिनिधी

येथील भवानी पेठमध्ये असणाऱ्या फायबरच्या कारखान्यास सायंकाळी ६ च्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्यानंतर काही काळातच आगीने रौद्ररुप धारण केले. या भीषण आगीची झळ आजूबाजूला असणाऱ्या घरांनाही बसली असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

भवानी पेठ येथील भवानी मातेच्या मंदिरापासून काही अंतरावच हा फायबरचा कारखाना आहे. यास सायंकाळच्या दरम्यान अचानक आग लागली. अगदी वर्दळीच्या ठिकाणी हा कारखान असल्याने या आगीची झळही आसपासच्या घरांना बसली आहे. आगीचे वृत्त समजताच अग्निशमनच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी ताबडतोब आग विझवण्याच्या कार्यास सुरुवात केली. अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.