Mon, Nov 20, 2017 17:23होमपेज › Pune › चाळीस फुटांवरून पडल्याने मृत्यू

चाळीस फुटांवरून पडल्याने मृत्यू

Published On: Nov 15 2017 2:51AM | Last Updated: Nov 15 2017 2:50AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी 

फ्लेक्ससाठी चाळीस फूट उंच लोखंडी बांधकाम सुरू असताना वरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा प्रकार काटे वस्ती, पुनावळे येथे सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला.

मच्छिंद्र अश्रू मांडगे (39, रा. जय भवानी चाळ, कोंढवा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे, तर संजय लोटन वाघ (रा. कोंढवा) या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विशाल मांडगे याने फिर्याद दिलेली आहे. मच्छिंद्र हे फ्लेक्ससाठी बांधण्यात येत असलेल्या लोखंडी वांधकामावर चाळीस फूट उंचावर काम करत होते. तेथून ते खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.