Sun, Aug 18, 2019 06:52होमपेज › Pune › दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या काळात समुपदेशन

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या काळात समुपदेशन

Published On: Feb 12 2019 3:34PM | Last Updated: Feb 12 2019 3:20PM
पुणे : प्रतिनिधी 

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेच्या काळात ताणतणावापासून सुटका करण्यासाठी राज्य मंडळाने समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परीक्षेच्या काळात सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत राज्यभरातील विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध असेल. यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १ मार्च ते २२ मार्चदरम्यान बोर्डाची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या काळात विद्यार्थ्यांना येणारे मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यभरात १० समुपदेशकांची नेमणूक केली आहे.

समुपदेशनाच्या माध्यमातून परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे, परीक्षेविषयीची भीती दूर करणे आदी काम केले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ७७६७९६०८०४ , ८६६८३९२२३२, ७०६६४७५३६०, ९६१९६४३७३०, ८४५९११२१३३, ७७९६८७४४७४, ९५६१२२०१५२, ८५३०६०८९४७, ७०६६१२८९९५, ७३८७५०१८९२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य बोर्डाने केले आहे. विद्यार्थी आणि पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था, प्रश्नपत्रिका आदी संदर्भात या समुपदेशकांना प्रश्न विचारू नयेत, असेही मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.