Tue, Jan 22, 2019 07:48होमपेज › Pune › पुणे :  ABVP आणि विद्यापीठ सुरक्षा रक्षकात राडा

पुणे :  ABVP आणि विद्यापीठ सुरक्षा रक्षकात राडा

Published On: Sep 14 2018 1:09PM | Last Updated: Sep 14 2018 1:22PMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेत मागेल त्याला काम मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे आंदोलन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना आत येण्यास मनाई केल्याने ABVP आणि सुरक्षारक्षकांत वादावादी झाली. 

कमवा आणि शिका योजनेत मागेल त्याला काम मिळावे. यासाठी घेण्यात येणारी मुलाखत बंद करावी. दर महिन्याच्या पाच तारखेला योजनेचे मानधन मिळावे आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे आंदोलन करण्यात आले. यावेळी कमवा व शिका योजनेचे समन्वयक प्रभाकर देसाई हजर नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. 

विद्यार्थ्यांचे कार्यालयाच्या गेटच्या बाहेर आंदोलन सुरू असून आंदोलन करत असताना उन्हामुळे चक्कर येवून विद्यार्थी कोसळल्याची घटना घडली आहे.