Wed, Apr 08, 2020 07:26होमपेज › Pune › 'पीएमपीएमएल'कडून नायडूतील रूग्णांना घरी पोहोचविण्यासाठी बससेवा

'पीएमपीएमएल'कडून नायडूतील रूग्णांना घरी पोहोचविण्यासाठी बससेवा

Last Updated: Mar 26 2020 6:19PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील नायडू रूग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील काही रूग्णांना उपचार पुर्ण झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर काहींना आगामी काळात डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यांना घरी पोहचविण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाकडून बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, रूग्णालय प्रशासनाकडून मागणी करण्यात आल्यानंतरच येथे बससेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ससूनची नवीन इमारत झाली कोविड-१९हॉस्पिटल

सध्या संपुर्ण शहर लॉकडाऊन असल्यामुळे शहरात एकही प्रवासी वाहन उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक रूग्णालयातील रूग्णांना घरी जाण्यासाठी एकही खासगी आणि सरकारी वाहतूक करणारे वाहन उपलब्ध होत नाही. त्यातच नायडू रूग्णालयातून बुधवारी ५ कोरोनाग्रस्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आगामी काळात आणखी काही कोरोनाग्रस्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यांना घरी पोहचविण्यासाठी पीएमपीकडून बस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रूग्णालय प्रशासनाच्या मागणीनुसार १ बस रूग्णांना घरी सोडण्यासाठी देण्यात येत आहे. तसेच, रूग्णांना घरी सोडल्यानंतर ही बस स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. असे देखील पीएमपीएमएल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.