Fri, Sep 20, 2019 21:30होमपेज › Pune › लाचखोरीत पुणे विभाग नं. १

लाचखोरीत पुणे विभाग नं. १

Published On: Mar 24 2018 1:52AM | Last Updated: Mar 24 2018 1:25AMपुणे : पुष्कराज दांडेकर 

सामान्यांची कामे अडवून त्यांच्याकडून पैसे घेऊन अडवणूक करणार्‍या लाचखोरांविरोधात लाचलुपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत पुणे विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. लाचलुपचपत प्रतिबंधक विभागाने राज्यातील 8 विभागांमध्ये 20 मार्चपर्यंत एकूण 196 सापळे रचून, लाचखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. पुणे विभागात मागील 81 दिवसांत 39 लाचखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे विभागात केलेल्या सापळा कारवाईत या कालावधीत उपजिल्हाधिकार्‍यांसह एक जीएसटी सहायक आयुक्‍त एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. 

राज्यातील वेगवेगळ्या खात्यांत काम करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांकडून वेगवेगळ्या कामांसाठी सामान्य नागरिकांकडे त्यांची कामे करण्यासाठी लाचेची मागणी करून अडवणूक केली जाते. दररोज विविध शासकीय खात्यांतून वेगवेगळी प्रकरणे समोर येत आहेत. जानेवारी 2018 ते 20 मार्च 2018 पर्यंत राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 196 यशस्वी सापळे रचून, लाचखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत.

 

Tags : pune, pune news, Bribery, Pune Division No one,