Wed, Jun 03, 2020 05:23होमपेज › None › इस्रोतील शास्त्रज्ञांच्या वेतनाला केंद्राची कात्री

इस्रोतील शास्त्रज्ञांच्या वेतनाला केंद्राची कात्री

Published On: Jul 12 2019 12:09PM | Last Updated: Jul 12 2019 12:29PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

इस्रोचे शास्त्रज्ञ सध्या चंद्रयान-२ यानाच्या लाँचिंगमध्ये गुंतले आहेत. देशाचे नाव जागतिक पातळीवर एका वेगळ्याच उंचीवर पोहोचविण्यासाठी ते दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. मात्र केंद्र सरकारकडून या शास्त्रज्ञांच्या वेतनात कपात करण्याचे धोरण आखले जात आहे. 

इस्रोच्या शास्त्रज्ञांना १९९६ पासून दोन अतिरिक्त वेतन वाढीच्या रुपात मिळत असलेला प्रोत्साहन भत्ता या पुढे मिळणार नसल्याचा आदेश केंद्र सकारने दिला आहे. १२ जुलै रोजी हा आदेश जारी केला असून १ जुलैपासून हा आदेश लागू होणार असल्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. या आदेशानंतर ड, ई, फ, आणि ग श्रेणीमधील शास्त्रज्ञांना प्रोत्साहन भत्त्यापासून वंचीत रहावे लागणार आहे. 

इस्रोमध्ये जवळपास १६ हजार शास्त्रज्ञ आणि अभियंते आहेत. जवळपास ८५ ते ९० टक्के शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचा समावेश ड, ई, फ, आणि ग या श्रेणीमध्ये असून सरकारी आदेशमुळे त्यांचे दरमहा ८ ते १० हजार रुपयांचे नुकसान होणार आहे. या आदेशामुळे शास्त्रज्ञ नाराज असल्याचे सुत्रांकडून समजते आहे.