Sun, Jul 05, 2020 13:26होमपेज › None › हिंदुस्थानी भाऊ म्हणतो, 'आर्मीचा अपमान, एकता कपूरने माफी मागावी' (VIDEO)

हिंदुस्थानी भाऊ म्हणतो, 'आर्मीचा अपमान, एकता कपूरने माफी मागावी' (VIDEO)

Last Updated: Jun 01 2020 5:44PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बिग बॉस-१३ चा स्पर्धक आणि मुंबईचा हिंदुस्थानी भाऊच्या निशाण्यावर टीव्ही क्वीन एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर आली आहे. हिन्दुस्तानी भाऊ रविवारपासून इन्स्टाग्रामवर एका दिग्गज सेलिब्रिटीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याविषयी बोलत होते. भाऊने म्हटले होते की, तो १ जूनला मोठा धमाका करणार आहे. आणि आता त्याने आपला एक व्हिडिओदेखील जारी केला आहे.

हिन्दुस्तानी भाऊने खार पोलिस ठाण्याच्या बाहेरील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने सांगितले की, एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याने तक्रारीची कॉपीही दाखवली. 

हिंदुस्थानी भाऊने म्हटलंय की, एकता कपूरने आपल्या एका वेब सीरीजमध्ये एका आर्मीच्या जवानाची कहाणी दाखवली आहे. या सीरीजमध्ये जवान ड्यूटीवर जातो आणि त्याच्या पत्नीचे अन्य एकासोबत अफेअर दाखवण्यात आले आहे. 

भाऊचे म्हणणे आहे की, या अफेअरच्या कहाणीमध्ये जवानांची वर्दी दिसते आणि रक्षक वर्दीचा अपमान होताना दिसत आहे. म्हणून  खार पोलिस ठाण्यात एकताविरोधात तक्रार दिली आहे. व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊने पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, भारतीय लष्कर आणि आदित्य ठाकरेंनाही टॅग केलं आहे. हिंदुस्थानी भाऊ बिग बॉस-१३ मध्ये दिसला होता.