Mon, Sep 16, 2019 03:57होमपेज › None › पहलू खानप्रकरणी एसआयटीकडे तपास

पहलू खानप्रकरणी एसआयटीकडे तपास

Published On: Aug 17 2019 8:54PM | Last Updated: Aug 17 2019 8:54PM
जयपूर : पुढारी ऑनलाईन 

पहलू खान मॉब लिंचिंग प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे (विशेष चौकशी पथक) सोपवण्यात आलेला आहे.  राजस्थान सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा हा निर्णय घेतला. येत्या 15 दिवसांत एसआयटीला आपला अहवाल राज्य सरकारला सादर करायचा आहे. अलवर जिल्हा न्यायालयाने बुधवारी पहलू खान खून प्रकरणातील 6 आरोपींची निर्दोष मुक्‍तता केली. 

खटला उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या अगदी सामान्य तपास प्रक्रियाही या प्रकरणात पोलिसांनी पूर्ण केल्या नाहीत. म्हणून ही सुटका झाल्याचे सरकारचे मत आहे. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत, असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले.