Mon, Jun 17, 2019 10:21होमपेज › National › #MeTooचा आवाज बुलंद; केंद्राकडून गंभीर दखल, तक्रारी हाताळण्यासाठी समिती 

#MeTooचा आवाज बुलंद; केंद्राकडून गंभीर दखल, तक्रारी हाताळण्यासाठी समिती 

Published On: Oct 12 2018 5:12PM | Last Updated: Oct 12 2018 5:12PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

#MeToo या हॅश टॅगच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार विरोधात महिलांनी आवाज बुलंद केला आहे. महिलांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी 'मी टू'च्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींच्या सुनावणीसाठी निवृत्त न्यायाधीशांचा समावेश असलेली चार सदस्यीय समिती स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे.

ज्या महिलांनी तक्रारी केल्या आहेत; त्यावर माझा विश्वास आहे. त्यांच्या वेदना आणि त्यांच्यावर झालेला आघात आपण समजू शकते. त्यासाठी पीडित महिलांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा माझा प्रस्ताव आहे. या समितीत वरिष्ठ न्यायाधीश, कायदा तज्ज्ञांचा समावेश असेल, अशी माहिती त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती दरम्यान दिली आहे.

वाचा : #MeTooच्या जाळ्यात मलिंगा; 'या' गायिकेने केला लैंगिक शोषणाचा आरोप

वाचा : #MeToo दिग्दर्शक सुभाष घईंनी दारू पाजून बलात्कार केला!

चार सदस्यीय समितीमार्फत महिलांच्या तक्रारी हाताळल्या जातील. काही तक्रारीत गरज पडल्यास कायदेशीर मदतही पुरविली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषण आरोप प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मेनका गांधी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होते की लैंगिक अत्याचाराची प्रकरणे गंभीरपणे घेतली जातील. कारण महिला उघडपणे बोलण्यास घाबरतात. जे पुरुष वरिष्ठ हुद्यावर आहेत; ते वारंवार गैरवर्तन करत असतात. मीडिया, राजकीय क्षेत्र आणि कंपन्यांमध्ये असे घडत असते. 

वाचा : #MeToo लैंगिक शोषणाचा आरोप; एम.के.अकबर यांची उचलबांगडी?