होमपेज › National › सुरक्षा यंत्रणा सतर्क; ड्रोन असल्याचा पोलिसांचा संशय    

PM मोदींच्या घरावर संशयास्पद फिरती तबकडी

Published On: Jun 14 2018 7:03PM | Last Updated: Jun 14 2018 7:55PMनवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी 7 जून रोजी एक फिरती तबकडी (यूएसओ) दिसून आली. यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. तसेच ही वस्तू ड्रोन कॅमेरा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला आहे.

याबाबत एनएसजी आणि दिल्ली हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांचे दिल्लीतील लोककल्याण मार्ग येथे निवासस्थान आहे. येथे 7 जून रोजी सायंकाळी एक यूएसओ फिरत असल्याचे अढळून आले. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या निवासस्थान परिसरातील 2 कि. मी.चा परिसर ‘नो फ्लाय झोन’ आहे. त्यामुळे या घटनेची सुरक्षारक्षकांनी गंभीर दखल घेतली आहे.

गत आठवड्यात नक्षलवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट केल्याची माहिती पुढे आली होती. यावरून राजकारणही रंगले आहे. अशाच परिस्थितीत आता यूएसओचे वृत्त येऊन धडकले असल्याने पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.