Sat, Jul 04, 2020 10:03



होमपेज › National › सोपोरमध्ये सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; १ जवान शहीद, ३ जखमी

सोपोरमध्ये सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; १ जवान शहीद, ३ जखमी

Last Updated: Jul 01 2020 9:02AM

file photo



श्रीनगर (जम्मू- काश्मीर) : पुढारी ऑनलाईन

जम्मू- काश्मीरमधील सोपोर येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाले आहेत. तर एका नागरिकाचा देखील या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तर ३ जवान जखमी असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

वाचा : गलवान खोर्‍यात आता भारताचे ‘भीष्म’ तैनात!

बुधवारी सीआरपीएफची एक तुकडी गस्त घालण्यासाठी निघाली होती. या दरम्यान सोपोरमधील मॉडेल टाऊन येथे सीआरपीएफच्या तुकडीवर गोळीबार झाला. घटनास्थळी सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडी पोहोचली असून या परिसराची घेराबंदी करण्यात आली आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली आहे.

वाचा : ‘टिक टॉक’च्या बंदीनंतर ‘चिंगारी’ ॲपची चलती, एका तासात झाले १ लाख वेळा डाऊनलोड

जम्मू- काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि सैन्यांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. या ऑपरेशन दरम्यान जून महिन्यात ४८ दहशतवाद्यांना मारण्यात आले आहे.

तसेच त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या भागात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. या दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. याला सुरक्षा जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
गेल्या सोमवारी दहशतवाद्यांनी बडगाम येथे सैन्यांच्या ५० आरआर तळावर ग्रेनेड फेकले होते. मात्र, ग्रेनेड तळावर पडले नाही.  

वाचा : ‘बीएसएफ’च्या आणखी ५३ जवानांना कोरोना