Mon, Dec 17, 2018 03:59होमपेज › National › टाटा मोटर्समध्येही #MeToo चे वादळं; अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचा आरोप  

टाटा मोटर्समध्येही #MeToo चे वादळं; अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचा आरोप  

Published On: Oct 12 2018 6:35PM | Last Updated: Oct 12 2018 6:35PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

#MeToo ने गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवुड, मीडिया जगत हादरले असतानाच आता या यादीमध्ये देशातील प्रतिष्ठित असलेल्या टाटा मोटर्स ची भर पडली आहे. एका महिला कर्मचाऱ्याने गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर टाटा मोटर्सने  कॉर्पोरेट कम्युनिकेशन प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. टाटा मोटर्सकडून या निर्णयाची माहिती देण्यात आली.

सुरेश रंगराजन असे त्या आरोप झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. महिला कर्मचाऱ्याने आरोप केल्यानंतर अंतर्गत चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणावर रंगराजन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्या पीडित महिलेने  ट्विटरवर स्क्रीनशॉट अपलोड करून गैरवर्तन झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर टाटा मोटर्सने गंभीर दखल घेत रंगराजन यांना सुट्टीवर पाठवले.