Sun, Mar 24, 2019 02:54होमपेज › National › अधिकार्‍यांना शरीरसुख द्या, महिला प्राध्यापकाचा विद्यार्थिनींना सल्‍ला

अधिकार्‍यांना शरीरसुख द्या, महिला प्राध्यापकाचा विद्यार्थिनींना सल्‍ला

Published On: Apr 17 2018 9:03AM | Last Updated: Apr 17 2018 9:03AMमदुराई : वृत्तसंस्‍था

तामीळनाडूतील एका कॉलेजमधील महिला प्राध्यापकाने गुण वाढवून देण्यासाठी चक्‍क विद्यार्थिनींना उच्च अधिकार्‍यांसोबत  लैंगिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. या प्रकरणातील महिला प्राध्यपकाची वीस मिनिटाची ऑडिओ क्‍लिप व्‍हायरल झाली. यामुळे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रही  ढवळून निघाले आहे. महिला प्राध्यापकाचा हा किळसवाणा प्रकार समोर आल्यानंतर कॉलेज प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले तसेच याप्रकरणी पोलिसा तक्रार दाखल झाल्यानंतर महिला प्राध्यापकाला अटक करण्यात आली.

चांगले गुण पाहिजे असतील तर उच्च अधिकार्‍यांना खूश करण्याचा सल्‍ला कॉलेजमधील विद्यार्थिनींना त्‍या देत होत्या. कोणत्याही अधिकार्‍याचे नाव तोंडी येऊ नये याचीही त्यांनी खबरदारी घेतली होती. या महिलेची राज्यातील अनेक बड्या अधिकार्‍यांबरोबर ओळख असल्याचे चर्चा रंगली आहेत. या प्रकरणी कॉलेज प्रशासनाकडून त्या महिलेला तात्‍काळ निलंबित केले आहे. सोशल मीडियावर व्‍हायरल झालेली ऑडिओ क्‍लिप वीस मिनिटाची असून यामध्ये त्या चार विद्यार्थिनींना चांगल्या गुणांबरोबरच पैशाचेही आमिष दाखवताना दिसते. 

मदुराई कामराज विद्यापीठाशी संलग्न असलेले देवांगा आर्टस्‌ कॉलेजमध्ये हे प्रकरण घडले आहे. व्‍हायरल झालेल्या ऑडिओ क्‍लिपमध्ये विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकार्‍यांना खूश करण्यासाठी त्या चार विद्यार्थिनींना पैशाचे व चांगल्या मार्कांचे आमिष दाखवत होत्या. निर्मला देवी विद्यार्थिनींना विद्यापीठातील अधिकार्‍यांना तुम्‍ही जर खूश ठेवला तर तुम्‍हाला चांगल्या गुणाबरोबरच पीएचडीपर्यंतच्या शिक्षणामध्ये कोणतीही अडचण येणार नसल्याचे त्‍या सांगत होत्या. विद्यार्थिनींना त्या हा निर्णय फायद्याचा असल्याने तुम्‍ही घाईगडबडी निर्णय घेऊ नका असा सल्‍लाही देत. याप्रकरणी निर्मला देवींनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या मागे कोणताही वाईट हेतू नव्‍हता.