Mon, Nov 20, 2017 17:25होमपेज › National › न्यायाधीश लाच प्रकरण;  SC चा ‘एसआयटी’ ला नकार

न्यायाधीश लाच प्रकरण;  SC चा ‘एसआयटी’ ला नकार

Published On: Nov 14 2017 6:18PM | Last Updated: Nov 14 2017 6:18PM

बुकमार्क करा

दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश लाच प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. 'न्यायालयातील ज्येष्ठ वकील बेताल आरोप करत आहेत,' असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने एसआयटीची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.

एका मेडिकल कॉलेजला सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या बाजुने निकाल देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप ओडिशा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर करण्यात आला  होता. याप्रकरणी सीबीअयने एफआयआर दाखल केली आहे. त्यामध्ये कोणत्याही सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे नाव घेण्यात आलेले नाही. यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्यात यावी, अशी याचिका प्रशांत भूषण यांनी दाखल केली होती. 

सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर निकाल देताना म्हटले ‘या याचिकेने देशातील न्यायसंस्थेच्या प्रतिमेचे नुकसान झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिंन्ह उपस्थित झाले आहे.’

सीबीआयने दाखल केलेली एफआयआर कोणत्याही न्यायाधीशाविरुध्द नाही, असा खुलासा सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. 

सर्वोच्च न्ययालयातील जेष्ठ वकिल प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्वचिंन्ह उपस्थित केले होते आणि या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. यावरुन दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात जोरदार खडाजंगी झाली होती आणि प्रशांत भूषण रागाने कोर्टातून बाहेर गेले होते.