Fri, Nov 15, 2019 00:14होमपेज › National › हरियाणा : हत्याकांड प्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू रामपाल दोषी

हरियाणा : हत्याकांड प्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू रामपाल दोषी

Published On: Oct 11 2018 2:17PM | Last Updated: Oct 11 2018 2:28PMहिसार (हरियाणा) : पुढारी ऑनलाईन

सतलोक आश्रमातील दोन हत्याकांड प्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू संत रामपाल याच्यासह २९ जणांना हिसार येथील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणी येत्या १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर हिसारमध्ये हिंसाचाराच्या घटना घडू नयेत म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काल बुधवारी जिल्ह्यात कलम १४४ लागू करून जमावबंदीचा आदेश दिला आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी १८०० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

रामपाल याच्या समर्थकांकडून उपद्रव होण्याची शक्यता असल्याने हत्याकांड प्रकरणावर निकाल देण्यासाठी हिसार येथील मध्यवर्ती कारागृहातच न्यायालयीन सुनावणी घेण्यात आली. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी. आर. चालिया यांच्यासमोर तुरुंगातच रामपाल व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून हजर झाला.

२०१४ मध्ये रामपाल याच्या आश्रमात त्याचे समर्थक आणि पोलिसांत धुमश्चक्री होऊन हिंसाचार भडकला होता. यात ७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात ५ महिला आणि १ मुलाचा समावेश होता. या प्रकरणी रामपालसह १४ जणांवर गुन्हे दाखल केले होते. रामपाल याच्यावर सुमारे ६ एफआयआर नोंद झाले आहेत. रामपालला नोव्हेंबर २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती.