Wed, Feb 20, 2019 14:52होमपेज › National › सानिया मिर्झाचं फोटोशूट विथ बेबी बंप 

सानिया मिर्झाचं फोटोशूट विथ बेबी बंप 

Published On: Jul 12 2018 6:16PM | Last Updated: Jul 12 2018 6:21PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

टेनिसपटू सानिया मिर्झा आई बनणार आहे. ती येत्या ऑक्टोबर महिन्यात आपल्या बाळाला जन्म देणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मध्‍यंतरी, सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला होता.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करून त्‍यांच्‍या घरात नवा पाहुणा येणार असल्‍याचे संकेत दिले होते. आता सानिया चर्चेत असण्‍याचं कारण म्‍हणजे मॅटरनिटी फोटोशूट. सानियाने हे फोटोज इन्‍स्‍टाग्रामवरदेखील शेअर केले आहेत. निळ्‍या रंगाच्‍या ड्रेसमध्‍ये ती दिसत आहे. सानियाने फोटा शेअर करून कॅप्‍शनही लिहिली आहे की, 'आय फील ब्‍ल्‍यू.' आणखी एका फोटोत ती लाल रंगाच्‍या ड्रेसम्‍ये दिसत असून आपला हात तिने बेबी बंपवर ठेवला आहे. सानियाच्‍या या पोस्‍टला फॅन्‍स कॉमेंट करून अभिनंदन करत आहेत. सानियाच्‍या या फोटोजवर कॉमेंट्‍सचा पाऊस पडत आहेत. 

सानिया मिर्झा प्रेग्‍नेंसी दरम्‍यान, आपल्‍या फिटनेसची काळजी घेत आहे. 

सानियाचा २०१० मध्‍ये पाकिस्‍तानी क्रिकेटर शोएब मलिकशी विवाह झाला होता. यावर्षीच्‍या एप्रिलमध्‍ये दोघांनी एक फोटो शेअर करून आनंदाची बातमी दिली होती. या फोटोत एका बाजूला मिर्झा आणि दुसऱ्या बाजूला मलिक असे लिहिलेले होते. तर मध्यभागी मिर्झा-मलिक असे लिहिले होते. विशेष म्हणजे या फोटोत मुलाचे संगोपन करण्याबाबतची काही चिन्हेही होती.
 

#MOMents captured by @digitaldiarybyzoya 💝

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar) on

I see you 👀😎

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar) on

Finding those moments 💝 👼🏽 📸 @digitaldiarybyzoya

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar) on

🎋🌳🍀☘️🌿😀😀😀

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar) on