होमपेज › National › सर्व महिलांना माझा सलाम! : राहुल गांधींकडून कौतुक

सर्व महिलांना माझा सलाम! : राहुल गांधींकडून कौतुक

Published On: May 19 2019 4:12PM | Last Updated: May 19 2019 4:12PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

काँग्रेस अध्‍यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी (ता.१९) सर्वसाधरण निवडणुकीत महत्‍त्‍वपूर्ण भूमिका निभावणार्‍या महिलांचे कौतुक केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात एक व्‍हिडिओ देखील शेअर केला.त्‍यांनी एक कॅप्‍शन देखील दिली आहे. 

लोकसभा निवडणुकींसाठी आज सातव्‍या आणि शेवटच्‍या टप्‍प्‍यासाठी मतदान होत आहे. याचे औचित्‍य साधत त्‍यांनी लोकसभा निवडणुकीत महिलांचे योगदान, त्‍यांचे मत किती महत्‍त्‍वाचे आहे यासंदर्भातील एक व्‍हिडिओ पोस्‍ट करत महिलांचे कौतुक केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमधील वाराणसीमधून लोकसभेसाठी दुसर्‍यांदा निवडणूक लढत आहेत. राहुल गांधी म्‍हणाले की, ' लोकसभा निवडणुकींसाठी आज सातव्‍या आणि शेवटच्‍या टप्‍प्‍यासाठी मतदान होत आहे. आपल्‍या माता आणि भगिनींनी या निवडणूकीत महत्‍त्‍वपूर्ण योगदान दिले आहे. फक्‍त उमेदवार म्‍हणून नाही तर मतदानकर्ता म्‍हणून देखील त्‍यांचा आवाज ऐकला पाहिजे. सर्व महिलांना माझा सलाम!' अशा शब्‍दात काँग्रेस अध्‍यक्ष राहुल गांधी यांनी स्त्री शक्‍तीचे कौतुक केले आहे. 

याआधी काँग्रेस प्रवक्‍ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी देखील ट्वीट केले. त्‍यांनी ट्वीटमध्‍ये म्‍हटले आहे की, 'देशाला प्रगतशील बनवण्‍यासाठी लोकसभा निवडणुकीच्‍या शेवटच्‍या टप्‍प्‍यासाठी मतदान करा. एक मत तरुणांचे भविष्‍य सशक्‍त बनवण्‍यास मदत करेल. एक मत शेतकर्‍याचे कर्जमाफी कमी करण्‍यास मदत करेल. एक मत लहान व्‍यापर्‍यांना फायदा मिळवून देणारे असेल. तसेच एक मत वंचितांना न्‍याय देण्‍यास मदत करेल'. 

लोकसभा निवडणुकीसाठी आज शेवटच्या टप्प्यातील ५९ जागांसाठी मतदान सुरु आहे. लोकसभेच्या सातव्या टप्प्यात १९ मे रोजी पंजाबमधील १३, उत्तर प्रदेशमधील १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहार आणि मध्य प्रदेशमधील प्रत्येकी ८, हिमाचल प्रदेशमधील ४, झारखंडमधील ३ आणि चंदीगडमधील एका जागेसाठी मतदान सुरु आहे. 

शेवटच्‍या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात मतदान होत आहे. येथे काँग्रेसकडून अजय राय आणि आघाडीकडून शालिनी यादव रिंगणात आहेत. अंतिम टप्प्यात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखवीर सिंह बादल फिरोजपूर येथून तर त्यांच्या पत्नी हरसमिरत कौर भटिंडा येथून निवडणूक लढवित आहेत. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या पत्नी प्रणीत कौर पटियाला येथून निवडणूक रिंगणात आहेत. 

तीन वेळा खासदार राहिलेले अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन दुमका येथून निवडणूक लढवित आहेत. पटणा साहिब येथून भाजपकडून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद तर काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा रिंगणात आहेत.