Sun, Oct 20, 2019 07:23होमपेज › National › राहुल यांच्याकडून केजरीवालांना आइए 'आप'का इंतजार है!   

राहुल यांच्याकडून केजरीवालांना आइए 'आप'का इंतजार है!   

Published On: Apr 15 2019 7:00PM | Last Updated: Apr 15 2019 7:00PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन  

दिल्लीच्या राजकीय पटलावर काँग्रेस आणि सत्ताधारी आम आदमी पक्षाचे सख्य सर्वश्रुत आहे. त्यातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली काँग्रेसमध्ये विस्तवही जात नाही, पण गेल्या काही महिन्यांपासून आम आदमीकडून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडीचा सुर येऊ लागल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. 

आपकडून सातत्याने आघाडी होत नसल्याने काँग्रेसवर प्रहार होत होते. आता अखेर आघाडीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच पुढाकार घेतला आहे. त्यांनी दिल्लीमध्ये चार जागा आपसाठी सोडण्यास तयारी दर्शवली आहे. राहुल यांनी आघाडीसाठी हात दिला आहे.  

राहुल यांनी ट्विट करत म्हणाले, दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपची आघाडी म्हणजे भाजपला पळवून लावल्यासारखे होणार आहे. त्यामुळे ते वास्तवात आणण्यासाठी काँग्रेस दिल्लीत आपला ४ जागा देण्यासाठी तयार आहे. राहुल यांनी आघाडीसाठी हात देताना केजरीवालांनी पुन्हा यू टर्न घेतल्याने चिमटाही काढला.  आघाडीसाठी आमच्याकडून दार अजूनही उघडे आहे, पण वेळ निघून जात आहे.