Sun, Nov 18, 2018 17:40होमपेज › National › लव्‍ह जिहाद : राजस्थानात एकाला जीवंत जाळले 

लव्‍ह जिहाद : राजस्थानात एकाला जीवंत जाळले 

Published On: Dec 07 2017 12:14PM | Last Updated: Dec 07 2017 12:10PM

बुकमार्क करा

जयपूर : वृत्तसंस्‍था 
लव्‍ह जिहादच्‍या नावाखाली एकावर वार करून त्‍याला जिवंत जाळल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना राजस्‍थानमधील राजसमंद येथे घडली असून, या घटनेचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, मृत व्‍यक्‍ती पश्‍चिम बंगालच्‍या माल्डा जिल्‍ह्‍यातील आहे. राजसमंदमध्‍ये कॉन्‍ट्रॅक्‍टवर काम करत होता. पोलिसांच्‍या माहितीनुसार, आरोपी शंभूनाथ याने त्‍यास काम देण्‍याच्‍या बहाण्‍याने एका निर्जन ठिकाणी नेले आणि तेथे त्‍याच्‍यावर वार करून नंतर पेट्रोल ओतून त्‍याला जिवंत जाळले. या घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्‍थळी पोहोचले. तेथे एक बाईक आणि चप्‍पल आढळून आले आहे. पोलिसांनी शोध मोहीम राबवून आरोपी शंभूनाथला अटक केली आहे. 

दरम्‍यान, सोशल मीडियावर व्‍हायरल झालेल्‍या व्‍हिडिओत आरोपी शंभूनाथने लव्‍ह जिहादचा उल्‍लेख केला असून, प्रत्‍येक जिहादीचा अशीच स्‍थिती होईल, असे म्‍हटल्‍याचे दिसत आहे. राजस्थानचे गृहमंत्री गुलाब चंद कटारिया यांनी या प्रकरणाचा तपास करण्‍याचे आदेश दिले आहेत.