Fri, Jan 24, 2020 05:55
    ब्रेकिंग    होमपेज › National › विरोध डावलून राहुल गांधी काश्मीर दौऱ्यावर!

विरोध डावलून राहुल गांधी काश्मीर दौऱ्यावर!

Published On: Aug 24 2019 8:46AM | Last Updated: Aug 24 2019 12:35PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काही विरोधी नेते आज, शनिवारी श्रीनगरमध्ये दाखल झाले. राहुल गांधी यांच्यासोबतच्या शिष्टमंडळात गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, शरद यादव, मजिद मेमन, मनोज झा, डी. राजा आदी नेत्यांचा समावेश आहे.

याच दरम्यान जम्मू- काश्मीरच्या प्रशासनाने विरोधी नेत्यांना दौरा टाळण्याची विनंती केली आहे. यामुळे प्रशासन आणि विरोधी नेत्यांमध्ये रस्सीखेच पहायला मिळण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरच्या सूचना आणि जनसपंर्क विभागाने विरोधी नेत्यांना आवाहन केले आहे की, श्रीनगर दौऱ्यावरती येऊ नका. यामुळे अन्य लोकांची गैरसोय होईल. आताचा कुठे येथील जनजीवन पूर्वपदावर येत असून ते विस्कळीत करण्याचा प्रयत्न करू नये.

राहुल गांधी यांनी याआधी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, काश्मीरमधील विविध भागातून हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. पंतप्रधानांनी याकडे शांती आणि निष्पक्षपणे पहावे. 

त्यावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नमूद केले होते की, मी राहुल गांधी यांनी काश्मीरला येण्याचे निमंत्रण देत आहे. त्यासाठी विमानाची व्यवस्था करू जेणेकरून येथे आल्यानंतर त्यांना येथील सध्यस्थिती पहायला मिळेल.