होमपेज › National › पत्रकार परिषद टाळता आली असती : महाभियोक्‍ता

पत्रकार परिषद टाळता आली असती : महाभियोक्‍ता

Published On: Jan 13 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 1:52AM

बुकमार्क करा
नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांकडून आयोजित अभूतपूर्व अशी पत्रकार परिषद टाळता आली असती. आता न्यायाधीश  सुसंवादाची खात्री देतील, अशी आशा महाभियोक्‍ता के. के. वेणुगोपाल यांनी व्यक्‍त केली आहे. चार न्यायाधीशांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेनंतर वेणुगोपाल यांनी तातडीने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांची भेट घेतली. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार न्यायाधीश वगळता इतर सर्व न्यायाधीशांनी विश्रांतीच्या काळात पत्रकार परिषदेबाबत गंभीरपणे चर्चा केली.