Sun, Oct 20, 2019 06:22होमपेज › National › निष्पापांचा जीव घेणाऱ्या नक्षलींना काँग्रेस 'क्रांतीकारक' म्हणते!

निष्पापांचा जीव घेणाऱ्या नक्षलींना काँग्रेस 'क्रांतीकारक' म्हणते!

Published On: Nov 09 2018 4:19PM | Last Updated: Nov 09 2018 4:19PMरायपूर : पुढारी ऑनलाईन

नक्षलग्रस्त छत्तीसगढ विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला दोन दिवसांचा कालावधी उरला असल्याने भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमधील आरोपांच्या फैरी अधिक तीव्रतेने धडाडू लागल्या आहेत. शहरी नक्षलवादावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर प्रखर हल्ला चढवला. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल घोटाळा, नोटबंदीवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर शाब्दिक प्रहार केले. नीरव मोदी, विजय मल्ल्या,  ललित मोदी, मेहुल चोक्सी यांच्या फरारी होण्यावरूनही मोदींचे वाभाडे काढले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  एका रॅलीला संबोधित करताना नक्षलवाद्यांवरून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ज्यांची मुलं परदेशात शिकत आहेत, मोठ्या गाड्या आहेत, एसीमध्ये राहणाऱ्या शहरी नक्षलींना काँग्रेस का पाठिंबा देत आहे? ज्यांच्यामुळे गरीब आदिवासी तरुणांचे आयुष्य बरबाद होत आहे. सरकार नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई करत असते, तेव्हा शहरी नक्षलावादी रस्त्यावर उतरतात, अशा लोकांना तुम्ही माफ करणार का, मी बस्तरमधील लोकांना आवाहन करतो की त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना धडा शिकवला पाहिजे. 

नोटबंदीमध्ये काळा पैसेवाला कुणी दिसलाच नाही : राहुल गांधी
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष यांनीसुद्धा मोदी सरकार हल्ला चढवला. राफेल घोटाळा, नोटबंदी आदी मुद्द्यांवरून राहुला यांनी मोदींना लक्ष्य केले. ते म्हणाले की, नोटबंदीच्या कालावधीमध्ये आपण सर्व रांगेत उभा होतो पण काळा पैसा घेऊन आलेला कुणीच दिसला नाही. पण निरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी तुमचा पैसा घेऊन फरार झाले. राहुल यांनी तेलाच्या वाढत्या किंमतीवरून सरकारवर टीका केली.