Wed, Jun 19, 2019 08:28होमपेज › National › 'अच्छे दिन संपले' : तिसऱ्या दिवशी पेट्रोल दरवाढ

'अच्छे दिन संपले' : तिसऱ्या दिवशी पेट्रोल दरवाढ

Published On: Jan 13 2019 10:24AM | Last Updated: Jan 13 2019 10:24AM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

गेल्‍या दोन महिन्यांपासून इंधन दरात होणारी कपात थांबली आहे. सलग तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. रविवारी दिल्‍लीत पेट्रोल ४९ पैशांनी तर डिझेल ५९ पैशांनी महाग झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल ४७ पैशांनी आणि डिझेलच्या दरात ६१ पैशांची वाढ झाली आहे. 

दिल्‍लीत एक लिटर पेट्रोलसाठी ६९.७५ रुपये मोजावे लागणार आहेत तर डिझेलसाठी ६३.६९ पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ७५.३९ रुपये तर डिझेल ६६.६६ रुपये झाले आहे. 

आंतरराष्‍ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे दर कमी झाल्‍याने भारतातही इंधनाच्या दरात कपात होत होती. परंतु, आता क्रुड ऑईलच्या किमतीत वाढ होत आहे, त्‍यामुळे इंधनाचेही दर वाढत आहेत. ७ जानेवारीपासून पेट्रोल कंपन्यांनी इंधनाचे वाढविण्यास सुरुवात केली आहे.