Mon, Jun 17, 2019 10:29होमपेज › National › पद्म पुरस्कारासाठी तब्बल ५०,००० नामांकने; गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ

पद्म पुरस्कारासाठी तब्बल ५०,००० नामांकने

Published On: Oct 12 2018 11:55AM | Last Updated: Oct 12 2018 11:55AMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

विविध क्षेत्रातील योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या २०१९ मधील पद्म पुरस्कारासाठी यंदा तब्बल ५० हजार नामांकने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे दाखल झाली आहेत. गेल्या वर्षीच्या (२०१७) तुलनेत यंदा नामाकंने ४० टक्क्यांनी अधिक आहेत.

गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर २०१८ पर्यंत ४९,९९२ नामांकने दाखल झाली आहेत. तर गेल्या वर्षी २०१७ मध्ये ३५,५९५ नामांकने दाखल झाली होती तर २०१६ मध्ये १८,७६८ आणि २०१० मध्ये १,३१३ नामांकने दाखल झाली होती. 

कला, शिक्षण, साहित्य, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, आभियांत्रिकी, विज्ञान, उद्योग, नागरी सेवा आदी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्म पुरस्काराने गौरविण्यात येते. मात्र, यंदा या पुरस्कारासाठी विक्रमी नामांकने दाखल झाली आहेत. २०१६ पासून पद्म पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकने दाखल करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. सोप्या, सुटसुटीत आणि सुरक्षित ऑनलाईन सुविधेमुळे मोठ्या संख्येने नामांकने दाखल झाली आहेत.

२०१९ मधील पद्म पुरस्काराची घोषणा प्रजासत्ताक दिनी केली जाणार आहे. यासाठी नामांकने सादर करण्यासाठी १५ सप्टेंबर २०१८ अंतिम मुदत होती.