होमपेज › National › राफेलवरून विरोधकांशी बोलण्याचा प्रश्नच नाही; ते त्यासाठी पात्र नाहीत : निर्मला सीतारामन 

राफेलवरून विरोधकांशी बोलण्याचा प्रश्नच नाही; ते त्यासाठी पात्र नाहीत : निर्मला सीतारामन 

Published On: Sep 14 2018 6:58PM | Last Updated: Sep 14 2018 6:58PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राफेल करारावरून विरोधकांशी कोणतीही बोलणी करण्याची शक्यता साफ शब्दात फेटाळून लावली. विरोधकांनी संरक्षण दलाच्या सक्षमीकरणाच्या मुद्यावर बरीच चिखलफेक केली असल्याने ते चर्चा करण्यासाठी पात्र नाहीत अशी खोचक टीका त्यांनी केली. राफेल कराराची तुलना बोफोर्सशी होऊ शकत नाही असेही सीतारामन यांनी नमूद केले.

केंद्र सरकारने दोन राफेल विमान खरेदीचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. लढाऊ विमानांसह चीन आणि पाकिस्तान आपली हवाईक्षमता वाढवत असल्याने दोन राफेल विमाने केंद्र सरकार तत्काळ खरेदी करणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी नमूद केले. त्या पुढे म्हणाल्या की, विरोधकांना बोलवून स्पष्टीकरण देण्यात काहीच हाशील नाही, युपीएच्या कार्यकाळातही ज्या मुद्यांवर सहमती झाली नव्हती अशा मुद्यांवरही ते चुकीची माहिती देऊन देशाची दिशाभूल करत आहेत, घोटाळा झाल्याचे सांगत आरोपांच्या फैरी करत करत आहेत. तुम्ही (विरोधक)संरक्षण तयारीची काळजी करत नाही. 

अणुकरारावरून युपीए कार्यकाळात विरोधकांनी आरोप प्रत्यारोप करून रणकंदन केल्यानंतर तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली होती. यावरून निर्मला सीतारामन यांना विचारले असते त्यांनी सांगितले की, विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांची उत्तरे संसदेमध्ये यापूर्वीच मी दिलेली आहेत, त्यामुळे त्यांना आणखी परत काय माहिती देणार आहे.