Wed, Apr 24, 2019 09:25होमपेज › National › ट्विटरवर सर्वांत चर्चित व्यक्तीमध्ये मोदी अव्वल; राहुल द्वितीय स्थानावर

ट्विटरवर सर्वांत चर्चित व्यक्तीमध्ये मोदी अव्वल; राहुल द्वितीय स्थानावर

Published On: Dec 06 2018 6:54PM | Last Updated: Dec 06 2018 6:57PM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

ट्विटर इंडियाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या २०१८ च्या आकडेवारीनुसार ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम क्रमांकावर चर्चित व्यक्ती राहिल्या. या यादीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी द्वितीय क्रमांकावर राहिले. 

No automatic alt text available.
सोशल मीडियावर मोदी लाट काही कमी झालेली नाही. इन्स्टाग्रामवरही पंतप्रधान मोदी यांनी बाजी मारली असून सर्वांधिक फॉलोअर्स त्यांना फॉलो करत आहेत. 
ट्विटर इंडियाच्या अहवालानुसार, २०१८ मध्ये मोदी ट्विटर प्लॅटफॉर्मवर सर्वांधिक चर्चेत असल्याचे आढळून आले. इतकेच नव्हे तर भाजपचेच चार नेत्यांनी देखील टॉप १० यादीमध्ये स्थान मिळवले आहे. तिसऱ्या क्रमांकावर भाजप अध्यक्ष अमित शहा, तर युपीचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ चौथ्या क्रमांकावर राहिले. 

Image may contain: 7 people, people smiling, text
ट्विटरवर झालेल्या सर्वाधिक चर्चेमध्ये केवळ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बिगर भाजप आणि काँग्रेस पक्ष सोडून एकमेव राजकीय नेते आहेत. केजरीवाल पाचव्या स्थानी आहेत. सहाव्या स्थानावर अभिनेता पवन कल्याण, सातव्या स्थानावर बॉलीवूड किंग खान शाहरूख खान, आठव्या स्थानावर अभिनेता विजय आणि महेश हे नवव्या स्थानावर आहेत. तर चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची आस बाळगून असलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे दहाव्या स्थानावर आहेत.