Wed, Jun 03, 2020 06:30होमपेज › National › पांडुरंग पावला! स्थगिती नाहीच!! खा. संभाजीराजेंची प्रतिक्रिया

पांडुरंग पावला! स्थगिती नाहीच!! खा. संभाजीराजेंची प्रतिक्रिया

Published On: Jul 12 2019 12:45PM | Last Updated: Jul 12 2019 12:41PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. या निर्णयाचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वागत केले आहे. पांडुरंग पावला! स्थगिती नाहीच!!, असे ट्विट त्यांनी केले आहे.

मराठा आरक्षणा संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात स्थगिती नाही, असे सांगत त्यांनी सरकारी वकिलांचे अभिनंदन केले आहे. 

आरक्षणाचा निकाल ऐकायला पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाची पायरी चढली. शाहू महाराजांना अपेक्षित बहुजनांना एकत्र करणारा निकाल लागेल असा विश्वास आहे. महाराष्ट्र सरकारने देशातील सर्वोत्तम वकिलांची फौज उभी केली आहे. त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर विश्वास वाटतो, 'आरक्षण' टिकेलच, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

मराठा आरक्षणावरील मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देता येत नसल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. तसेच यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीतील अडथळा तुर्तास तरी दूर झाला आहे.