Sat, Aug 24, 2019 11:07होमपेज › National › विकृती : ९ वर्षीय मुलावर ३६ वर्षीय महिलेचा गेल्या वर्षभरापासून बलात्कार 

विकृती : ९ वर्षीय मुलावर ३६ वर्षीय महिलेचा गेल्या वर्षभरापासून बलात्कार 

Published On: Feb 11 2019 3:12PM | Last Updated: Feb 11 2019 3:12PM
मलप्पुरम : पुढारी ऑनलाईन 

केरळमध्ये एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ वर्षाच्या मुलावर बलात्कार केल्याची घटना घडली. या महिलेवर ९ वर्षाच्या मुलावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्या विकृत महिलेविरोधात गुन्हा नोंद केला. केरळमधील थेहनीप्पलममध्ये ही घटना समोर आली.

पीडित मुलाने झाल्या प्रकाराची माहिती डॉक्टरांना दिल्याने महिलेचा विकृतपणा समोर आला. डॉक्टरांनी घटनेतील गांभीर्य ओळखून बालहक्कासांठी लढणाऱ्या संबंधितांना माहिती दिली. त्यानंतर या प्रकणात पोलिसांकडे गुन्हा नोंद करण्यात आला. गेल्या वर्षभरापासून त्या विकृत महिलेकडून त्या पीडित मुलावर अत्याचार सुरू होते. 

महिलेने केलेल्या लैंगिक छळामुळे त्या पीडित मुलाच्या मानसिकतेवर विपरित परिणाम झाल्याचे बालहक्कांसाठी लढणाऱ्या संस्थेने सांगितले. पोलिसांनी त्या महिलेविरोधात पॉस्को कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी महिला पीडित मुलाची नातेवाईक आहे. ती त्याच्या घराजवळच रहाते.